त्यामुळे योगाचे खरे स्वरूप जाणून घेणे गरजेचे आहे

त्यामुळे योगाचे खरे स्वरूप जाणून घेणे गरजेचे आहे

सध्या योगाबाद्दल जिज्ञासा, चर्चा व प्रत्यक्ष अभ्यास करण्याची इच्छा वाढत्या प्रमाणात आढळून येते. पण बरेचदा योगाबद्दलचा दृष्टीकोन स्पष्ट असतोच असे नाही. एकदा ग्रामीण भागातील एक रुग्ण आला व म्हणाला, ”डॉक्टर तुम्ही औषधांबरोबर जादुटोणा ही करता असे कळले.” माझ्या लक्षात आले की मी रुग्णांना योगाभ्यासाचा जो सल्ला देतो, त्या संदर्भात तो बोलत होता. एकदा एका योगाच्या विशिष्ट प्रकाराच्या कार्यक्रमात सहभागी होणारा तरूण म्हणाला, “माझी कुंडलिनी जागृत झाली आहे, तुमचीही मी जागृत करून देऊ शकतो.” एकदा अनेक प्रकारच्या व्याधींचा पाढा वाचणार्‍या रुग्णाला योगवर्गाला जाण्याचा सल्ला दिला तर तो म्हणाला, “योग तर मी नेहेमीच करतो” लगेच त्याने त्याचे आसनांचे फोटो मला दाखवले. एकदा एक योगशिक्षक म्हणाला, ”मी सर्व आजार योगाने बरे केलेले आहेत”. दुसरीकडे रुग्णांना अनेक डॉक्टरांकडून असा सल्ला मिळतो की, “अजिबात योग करू नका, त्यामुळे तुमचा आजार वाढेल”. काहींना वाटते की योग म्हणजे म्हातार्‍या कोतार्‍यांचेच काम आहे. असे असंख्य गैरसमज योगाबद्दल आहेत, त्यामुळे योगाचे खरे स्वरूप जाणून घेणे गरजेचे आहे.

 

Vote: 
No votes yet
Language: 
Quiz: